आयफोन 15 बद्दल संपूर्ण माहिती

                        All information about new iphone 15

All information about new iphone 15

नुकताच 22 सप्टेंबेर 2023 रोजी संपूर्ण जगात बहू चर्चित असणार आयफोन 15 फोन बाजारात खरेदी साठी उपलब्ध झाला आहे . आय फोन 15 बद्दल अॅपल कंपनी ने आपल्या ग्राहकांमध्ये गेल्या काही महिन्यात प्रचंड उत्सुकता बनवली होती. हा नवीन फोन घेण्या साठी दुकानाबाहेर लोकांनी पहिल्याच दिवशी  भरपूर लांबच लांब रांगा लावल्या होत्या .कंपनी ने काही दिवसांपूर्वी पासून ह्या मोबाइल फोन चे आगाऊ बूकिंग चालू केले होते. ग्राहकांमध्ये अॅपल कंपनी च्या ह्या नवीन उत्पादना बद्दल भरपूर क्रेझ आहे . नवीन आयफोन 15 हा 4 वेगळ्या प्रकरांमधे उपलब्ध आहे.

आयफोन 15,आयफोन 15 प्लस ,आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकरांमध्ये उपलब्ध आहे.

(image courtesy- apple.com)

आता आपण आयफोन 15 च्या वैशिष्टयांबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ .

अॅपल कंपनी दरवेळी नवीन आयफोन बाजारात आणताना काही आकर्षक वैशिष्ट सोबत घेऊन येतात. आयफोन 15 बाजारात उपलब्ध करून देण्या आधी कंपनीने काही गोष्टींबद्दल भरपूर उत्सुकता तयार केली. जसे की फोन ची बॉडी टिटॅनिअम नावाच्या धातू पासून बनवली गेली आहे. ह्या धातू चे वजन हलके पण टिकाऊ आणि जास्त दणकट असतो .  ह्यामुळे बऱ्याच प्रमाणात मोबाइल चे वजन कमी करण्याचे  कंपनी ने बऱ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. हा मोबाइल पाणि आणि धूळ प्रतिबंधक आहे .आयफोन 15 च्या 4 वेगवेगळ्या प्रकरांच्या वर्गीकरणआ वरुण आपण प्रत्येक प्रकारचे वैशिष्ट्य बघूया .

  1. आयफोन 15 – हा मोबाइल काळा,निळा ,हिरवा ,पिवळा आणि गुलाबी अशा पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल 128 gb ,256 gb , 512 gb अशा वेगवेगळ्या स्टोरेज क्षमते मध्ये उपलब्ध आहे. ह्या प्रकारातील मोबाइल चे वजन 171 ग्रॅम इतके आहे. ह्या मोबाइल ची लांबी 147.6 mm आणि रुंदी 71,6 mm इतकी आहे , तर 7.8 mm इतकी जाडी आहे. आयफोन 15 चा  डिस्प्ले 6.1 इंच इतका आहे तर सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे . ह्या मोबाइल चा मुख्य कॅमेरा 48 मेगा पिक्सेल आहे.आय फोन 15 ह्या मोबाइल ची बॉडी अॅल्युमिनियम धातू पासून बनवली आहे.  

2. आयफोन 15 प्लस  – हा मोबाइल काळा,निळा ,हिरवा ,पिवळा आणि गुलाबी अशा पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल 128 gb ,256 gb , 512 gb अशा वेगवेगळ्या स्टोरेज क्षमते मध्ये उपलब्ध आहे. ह्या प्रकारातील मोबाइल चे वजन 201 ग्रॅम इतके आहे. ह्या मोबाइल ची लांबी 160.9 mm आणि रुंदी 77.8 mm इतकी आहे , तर 7.8 mm इतकी जाडी आहे. आयफोन 15 प्लस चा  डिस्प्ले 6.1 इंच इतका आहे तर सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे .ह्या मोबाइल चा मुख्य कॅमेरा 48 मेगा पिक्सेल आहे. आय फोन 15 प्लस  ह्या मोबाइल ची बॉडी अॅल्युमिनियम धातू पासून बनवली आहे. 

3.आयफोन 15 प्रो – एरोस्पेस ग्रेड चे टिटॅनिअम डिझाईन असणारा आयफोन 15 प्रो हा आयफोन च्या श्रेणी मधील पहिला मोबाइल आहे. हा मोबाइल काळा टिटॅनिअम,निळा टिटॅनिअम, पांढरा टिटॅनिअम आणि नॅच्युरल टिटॅनिअम अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल 128 gb ,256 gb , 512 gb आणि 1 tb  अशा वेगवेगळ्या स्टोरेज क्षमते मध्ये उपलब्ध आहे. ह्या प्रकारातील मोबाइल चे वजन 187 ग्रॅम इतके आहे. ह्या मोबाइल ची लांबी 146.7 mm आणि रुंदी 71.5 mm इतकी आहे , तर 7.65  mm इतकी जाडी आहे. आयफोन 15 प्रो चा  डिस्प्ले 6.1 इंच इतका आहे तर सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे . ह्या मोबाइल चा मुख्य कॅमेरा 48 मेगा पिक्सेल आहे.आय फोन प्रो  15 ह्या मोबाइल ची बॉडी टिटॅनिअम धातू पासून बनवली आहे.

4. आयफोन 15 प्रो मॅक्स  – एरोस्पेस ग्रेड चे टिटॅनिअम डिझाईन असणारा आयफोन 15 प्रो मॅक्स हा आयफोन मोबाइल आहे. हा मोबाइल काळा टिटॅनिअम,निळा टिटॅनिअम, पांढरा टिटॅनिअम आणि नॅच्युरल टिटॅनिअम अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल 128 gb ,256 gb , 512 gb आणि 1 tb  अशा वेगवेगळ्या स्टोरेज क्षमते मध्ये उपलब्ध आहे. ह्या प्रकारातील मोबाइल चे वजन 187 ग्रॅम इतके आहे. ह्या मोबाइल ची लांबी 159.9 mm आणि रुंदी 76.7 mm इतकी आहे , तर 8.25 mm इतकी जाडी आहे. आयफोन 15 प्रो मॅक्स चा  डिस्प्ले 6.7 इंच इतका आहे तर सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे . ह्या मोबाइल चा मुख्य कॅमेरा 48 मेगा पिक्सेल आहे.आय फोन 15 प्रो मॅक्स  ह्या मोबाइल ची बॉडी टिटॅनिअम धातू पासून बनवली आहे. 

(image courtesy- apple.com)

अशा प्रकारे आयफोन 15 च्या श्रेणीतील विविध मोबाइल ची वैशिष्ट्ये आहेत. आय फोन 15 च्या बेसिक मोबाइल ची किंमत 79,900 पासून सुरू होते, तर आय फोन 15 प्रो ची किंमत 1,34,900 च्या आसपास आहे. सामान्य माणसांना न परवडणाऱ्या किमती असून सुद्धा आय फोन 15 च्या खरेदी साठी महिन्या पासून बूकिंग चालू झाले होते. तसेच अजून ही लोकांना हा मोबाइल सहज पणे  उपलब्ध होऊ शकत नाहीये. ज्या लोकांनी आगाऊ बूकिंग करून हा मोबाइल मिळवला आहे, त्या लोकांनी मोबाइल बद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच लोकांनी काही अंशी मोबाइल चे वजन सोडले तर बाकी वैशिषटयांमद्धे फारसा काही फरक जाणवलेला नाही.