उत्तराखंड बोगद्यामध्ये अडकलेल्या मंजुरांची अखेर सुखरूप सुटका काशी झाली ?

Finally how Uttarakhand Tunnel rescue operation happened?

ह्यावर्षी ऐन दिवाळी च्या तोंडावर संपूर्ण देश फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मग्न होता, तेव्हा अचानक वृत्त वाहिन्यांवर उत्तराखंड मध्ये बोगद्या चे काम चालू असताना अचानक बोगदयात भुसखलन होऊन ४१ मजूर आत अडकल्याच्या बातम्या झळकू लागल्या. ऐन सनसुदीच्या काळात अशी बातमी आल्याने करोडो भारतीयांनी हळहळ व्यक्त केली . प्रशासनाने ताबडतोब काही उपाय योजना आखल्या . मंजुरांच्या नातेवाइकांनी आपल्या प्रिय जनांच्या सुखरूप सुटके साठी प्रशासनाला वेठीस धरायला चालू केले .

ह्या बोगद्या चे नाव सीलकायरा बोगदा असे आहे. भारतातील प्रमुख चारधाम तीर्थ क्षेत्रांना जोडणाऱ्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी दुपदरी ८९० किमी  नॅशनल हायवे चे काम सध्या उत्तराखंड राज्यात  जोमात चालू आहे. सीलकायरा बोगदा ह्याच महत्त्वाकांक्षी योजने चा भाग आहे. उत्तराखंड चा बराचसा भाग हा उत्तर हिमालयीन भागात येतो. भू तज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या भागातील जमीन स्तरीत खडक पासून तयार झाली आहे. त्यामुळे यात माती,दगड धोंडे,आणि गालाचे प्रमाण जास्त आहे.त्यातील बराचसा भाग हा काही प्रमाणात कठीण तर काही प्रमाणात मऊ आहे. अशा मुळे जमिनीची ताकत कमी होते. ह्या भागातील बहुतांश जमीन ही पूर,भूकंप ह्यांसारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये बिघाड होण्यास अतिशय पूरक आहेत. हिमालयीन पर्वतरांग ही जगातील सर्वात तरुण पर्वतरांग आहे. त्याच्या संरचणे नुसार हा भाग भूकंप प्रवण असल्याचा बऱ्याच तज्ञांच म्हणणं आहे. ह्याच भागात सर्वात जास्त पाऊस आणि सर्वात जास्त बर्फ पडतो. त्यामुळे जमिनीच्या सर्वात वरच्या भागाची लवकर झीज व्हायला लागते. असे असल्या मुळे ह्या जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण देखील तुलनेने जास्त आहे. त्यामुळे अशा भागात बोगदा खोदणे सहज शक्य नाही आणि काही प्रमाणात सुरक्षित देखील नाही.

Official data नुसार उत्तराखंड मध्ये ह्यावर्षी १००० हून जास्त ठिकाणी जमीनी खचल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला बऱ्याचशा घरांना भेग पाडण्याचे प्रमाणही पाहायला मिळाले.

१२ नोवेंबर रोजी सीलकीयारा ते बारकोट अशा जवळपास ५ किमी बोगद्याचे काम चालू असताना हा बोगदा कोसळला आणि ४१ मजूर आत मध्ये अडकले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायचे सचिव अनुराग जैन ह्यांनी वृत्त वाहिन्यांना दिलेल्या माहिती वरून ह्या बोगद्याची एकूण लांबी ४.४८ किमी इतकी असून सिलकीयारा च्या बाजूने ८० किमी पर्यन्त हा बोगदा बांधून तयार झाला होता. त्यानंतर चा जवळपास २२० मीटर चा थोडा भाग ठिसूळ झाला असल्या मुळे, मागील चार ते साडे चार वर्षात तिथे काहीही काम झाले नव्हते . त्यानंतर त्यापुढे काम सुरू केले असता बोगदा खचला आणि साधारण ६० मीटर जाडी ची राडारोडयाची भिंत मध्ये तयार झाली. त्या पुढील २ किमी चे बांधकाम पूर्ण असल्या मुळे तो भाग संपूर्ण सुरक्षित होता आणि सुदैवाने सर्व मजूर ह्याच भागात अडकले होते. हा भाग साधारण २ किमी लांब आणि ८.५ मीटर उंच असल्या मुळे सगळे मजूर इथे सुरक्षित होते.

(image courtesy-NDTV)

आता प्रश्न राहिलेला ६० मीटर जाड भिंती च्या पार असणाऱ्या मजुरांना बाहेर कसे काढणार. त्यासाठी ९० सेंटीमीटर व्यासाचा पाइप ह्या भिंती मधून पलीकडे पाठवण्याचे ठरविले. त्यासाठी भारत सरकार च्या खालील ५ संस्था कार्यरत झाल्या .

  • ऑइल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन (ONGC)
  • सतलाज जल विद्युत निगम
  • रेल विकास निगम लिमिटेड
  • नॅशनल हायवे अँड इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (NHIDCL)
  • टेहरी हायड्रो डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (THDCL)

हया पाईप मधून मजुरांना खाण्या पिण्या च्या गोष्टी पुरवण्याचे नियोजन केले. वर नमूद केलेल्या सर्व संस्थांनी चहू बाजूंनी ड्रिलींग करून सिल्कियरा च्या बाजूने आत जाण्याचा प्रयत्न चालू केला. ह्या भारतीय संस्थां बरोबरच इंटर टनेलिंग अंडर ग्राउंड स्पेस असोसिएशन चे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स हे देखील उत्तर काशी मधे दाखल झाले. हा संपूर्ण प्रदेश मुळातच दैनंदिन प्रवासा साठी सुध्दा सोपा नाहीये.त्यात असे बचाव कार्य करणे खूपच अवघड काम होते.

दरम्यान आत अडकलेल्या मजुरांना बाहेर सुखरूप काढेपर्यंत आत मध्ये सुरक्षित ठेवणे, ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी प्रशासनावर होती. एक ६ इंच पाइप च्या मदतीने आत मधील मजुरांना औषधे,अन्न अशा आवश्यक गोष्टी पाठवण्याची सोय करून देण्यात आली. आतील लोकाना बाहेत काढण्यासाठी ९० सेंटीमिटर व्यासांचा पाइप आत ड्रिल करून पाठवण्याचे पक्के झाले. हा पाइप आत सोडण्या साठी ऑगर मशीन आणण्यात आली. सर्व काही व्यवस्थित आणि ठरल्या प्रमाणे चालू असताना ड्रिल मशीन अवघ्या मिटर वर आले असताना त्याचे ब्लेड्स तुटले. अशी कठीण परिस्थिति उद्भवल्या नंतर अखेरीस रॅट माइनॉर्स (rat minors )जे अतिशय प्रतिकूल परिस्थिति मध्ये खाणी मध्ये काम करतात,अशा लोकाना पाचारण करण्यात आले. अतिशय कौशल्याने तुटलेले blades चे तुकडे ह्या रॅट माइनॉर्स ने बाजूला करत पाइप आत सारकवण्या साठी जागा उपलब्ध करून दिली .

अखेरीस ठरवल्या प्रमाणे काम यशस्वी पार पडले आणि मोठ्या पाइप मधून सर्वप्रथम NDRF चे जवान आत गेले. आत जाऊन त्यांनी कमजोर आणि अशक्त मंजुरणा बाहेर काढले. अखेरीस १७ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेले ४१ मजूर सुखरूप बाहेर आले. भारतातील काही सर्वात मोठ्या मोहिमामधील ही एक मोहीम होती जिथे केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या विविध संस्था कार्यरत होत्या .