How to do preparations at home to welcome Lord Ganesha?
How to do preparations at home to welcome Lord Ganesha?
प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिद्धये ॥
कोणत्याही नवीन आणि शुभ कार्याची सुरुवात आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. गणपती देवता ही बुद्धीची देवता आहे. मनापासून गणेशाची प्रार्थना केल्यास त्याच्या आशीर्वादाने सगळी कामे सुरळीत पार पडतात. भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोक गणपती बाप्पाला मानतात. परदेशात स्थायिक झालेले भारतीय आवडीने गणेश स्थापना करतात.
गणपती महाभारत या पौराणिक ग्रंथाचा लेखनिक होता. गणेश म्हणजेच गणांचा ईश आणि गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक.
अशा ह्या आपल्या लाडक्या बाप्पा च्या जन्माची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया.
आपल्या शरीराला लावलेला हळद अणि उंटण्याचा लेपापासून देवी पार्वतीने एक छोटीशी सुंदर मुर्ती तयार केली.त्या मुर्तीत प्राण फुंकले.देवी पार्वतीने ह्यास तिचा पुत्र म्हणुन स्विकार केले.एकेदिवशी आपल्या ह्याच पुत्राला देवी पार्वती दारपाल म्हणुन नेमतात आणि माझे स्नान होईपर्यत कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी आज्ञा देऊन स्नान करण्यासाठी स्नान गृहात निघुन जातात.
काहीच क्षणात साक्षात महादेव तिथे येतात.देवी पार्वतीचा पुत्र त्यांना स्नानगृहात जाऊ देत नाही.
दारावर उभा बालक महादेवांना सांगतो की माझ्या मातेची अशी आज्ञा आहे की मी स्नानगृहात कोणालाही प्रवेश करू देऊ नये.
म्हणुन तुम्ही देखील स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही.
बालकाच्या अशा बोलल्याने महादेव प्रचंड संतापतात
क्रोधाने लाल झालेले महादेव रागात त्यांच्या त्रिशुळाने ह्या बालकाचे मस्तक धडापासुन वेगळे करतात.त्यानंतर देवी पार्वती स्नान करून बाहेर येतात तेव्हा त्यांना तिथे झालेला सर्व प्रकार पाहतात.
झालेला प्रकार पाहुन क्रोधित झालेल्या पार्वती माता होता सृष्टीचा विनाश करण्यास निघतात मग सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर आणि क्षमा मागितल्यावर देवी शांत होतात.बालकाला पुनर्जिवित करावे अणि त्याला सर्वात पुज्य स्थान दिले जावे अशी मागणी पार्वती देवी महादेवाकडे करतात.
महादेव देवी पार्वती यांची मागणी मान्य करतात.महादेवांच्या आज्ञेवरून त्यांचे गण हत्तीचे शिर कापुन महादेवासमोर हजर होतात.
हेच हत्तीचे शिर महादेव त्या बालकाच्या धडावर लावतात अणि त्याला पुनजिर्वित करतात.यानंतर महादेव अणि पार्वती ह्या बालकास स्वपुत्र म्हणुन स्वीकार करतात.
गज म्हणजे हत्ती आनन म्हणजे मुख म्हणजेच गजानन,अर्थात आपला लाडका गणपती.
हे सर्व घडले तो दिवस चतुर्थीचा होता म्हणुन ह्या दिवसाला तेव्हापासुन गणेश चतुर्थी म्हणुन महत्व प्राप्त झाले अणि हा दिवस तेव्हापासुन गणेश चतुर्थी म्हणुन साजरा केला जाऊ लागला. अशी गणपती बाप्पाच्या जन्माची पौराणिक कथा आहे.
यंदाच्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण सगळेच सज्ज झालो आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ला साधारण ॲागस्ट महिन्यात घरोघरी गणपती येतात. यावर्षी मात्र अधिक महिन्यामुळे १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश आगमनाचा मुहूर्त आहे. यावर्षी मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी असून, चतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी १२ वाजून ३९ मिनिटांनी असून चतुर्थी तिथी समाप्ती: १९ सप्टेंबर २०२३ रोजी १ वाजून ४४ मिनिटांनी आहे.आजकाल महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील कानाकोपरयात आणि भारताबाहेरील देशांतही हा आनंदोत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी संपूर्ण घराची धावपळ सुरू असते पण विशेषतः घरातील गृहिणींची विशेष तारांबळ उडते.या लेखात आपण गृहिणींना उपयुक्त अशा काही खास टिप्स देणार आहोत,ज्यामुळे त्यांची सणासुदीची धावपळ काही प्रमाणात कमी होईल.
१. गणपती पूजेसाठी लागणाऱ्या सर्व सामानाचे यादी करून लवकर खराब न होणारे सामान २-३ दिवस आधीच आणून व्यवस्थित जागी ठेऊन द्या.उदा- हळदी कुंकू, अगरबत्ती,नारळ,रांगोळी
२. जास्त काळ न टिकणारे सामान साधारणतः आदल्या दिवशी आणावे.उदा-फुले,फळे
३.प्रत्येक दिवसाचा प्रसाद काय बनवावा हे आधीच ठरवून त्याची आदल्या दिवशी पूर्वतयारी करून ठेवावी.
४.आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची यादी करुन जेवणाचा मेनू तयार करावा आणि त्याप्रमाणे जमेल इतके सामान आणून ठेवावे.
५. आरती साठी प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ बनवायचा असल्यास, त्याची पूर्वतयारी करून ठेवावी.
६. गणपती सजावटी साठी लागणारे सामान आणि इतर तयारी यांची घरातील सदस्यांमधे चर्चा करुन प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कामांची विभागणी करावी.
७.गणेश स्थापना किंवा सत्यनारायण पूजे साठी गुरूजींना आमंत्रित करायचे असल्यास काही दिवस आगाऊ सांगून ठेवावे.
८.शक्य असल्यास पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करावा.
९.गणेशोत्सवात घरातील वातावरण मंगलमय रहावे यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करावे.त्यानंतर घरातील साफसफाई करून देवपूजा करावी. दरवाजा समोर रांगोळी काढावी.वातावरणात प्रसन्नता येण्यासाठी सुगंधित धूप अगरबत्तीचे प्रज्ज्वलन करावे.
१०. सण समारंभांमधे स्रियांमधील जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वेशभूषा. गणपती सणात घरातील सर्व सदस्यांसाठी जे पारंपारिक पेहेराव परिधान करायचे आहेत ते सर्व काही दिवस आधी स्वच्छ धुवून किंवा इस्री करून नीटनेटके ठेवावे. जेणे करून ऐनवेळी धावपळ होणार नाही.
अशाप्रकारे काही गोष्टींची पूर्वतयारी केल्यास नक्कीच आपल्याला सण समारंभामध्ये वेळेची बचत करता येईल आणि सर्व गोष्टींचा आनंद घेत येईल.
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Nice Article. Good job.